उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच अनुदान खात्यावर

उस्मानाबाद : सततच्या पावसाच्या अनुदानासाठी लोहारा शेतकऱ्यांनी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी आंदोलन उभे केले होते. त्याला यश आले. असून 13 ऑक्टोबर रोजी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज तहसील स्तरावरती निधी वितरित करण्यात आलेला आहे.
तालुकास्तरावरती निधी वितरित झाला आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यात सर्वाधिक निधी हा माझ्या लोहारा तालुक्याला मिळाला आहे पूर्वी मी जाहीर केल्याप्रमाणे लोहारा तालुक्यातील 30 हजार 697 शेतकऱ्यांना 34 कोटी 45 लाख 42 हजार रुपयांचा घसघशीत निधी तहसील स्तरावरती आलेला आहे. या रकमेचे दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना वाटप होईल. सर्व शेतकरी बांधवांनी दिलेली खंबीर साथ यामुळेच हे शक्य झाले. जिल्ह्यातील अन्य तालुक्याला मिळालेला निधी पुढील प्रमाणे उस्मानाबाद 11,195 शेतकऱ्यांना 13 कोटी 63 लाख रुपये, तुळजापूर 84 हजार 80 शेतकऱ्यांना 82 कोटी 17 लाख, उमरगा 10 हजार 710 शेतकऱ्यांना 14 कोटी 79 लाख भूम 5926 शेतकऱ्यांना 4 कोटी 26 लाख,परंडा 2471 शेतकऱ्यांना 1 कोटी 40 लाख,कळंब 821 शेतकऱ्यांना 66 लाख 64 हजार,वाशी 2013 शेतकऱ्यांना 1 कोटी 86 लाख
याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 153 कोटी 25 लाख 17 हजार रुपये मिळालेले आहे. लोहारा तहसील स्तरावर निधी वितरित झाला असून तीन-चार दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना मिळेल लोहारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे जगताप यांनी अभिनंदन केले.
🔴 अतिवृष्टी व शंकी गोगलगायच्या मदतीतून लोहारा तालुक्याला वगळल्यानंतर माझ्या नेतृत्वाखाली तालुक्यात शेतकऱ्याचे आंदोलन उभे राहिलं होतं ते लोन जिल्ह्यात पसरलं शेतकऱ्यांची एकी झाली आणि राज्य शासनाने उपसमिती नेमून 28 सप्टेंबरला निर्णय घेतला होता. त्यानुसार आज जिल्हास्तरावरती रक्कम वितरित होऊन ती तालुकास्तरावर ती ही वितरित करण्यात आली शेतकऱ्यांना दोन-तीन दिवसात वाटप होईल शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.
अनिल जगताप,माजी जिल्हा उपाध्यक्ष-राष्ट्रवादी कॉग्रेस
ह्या अनुदानामधून् साहेब लोक किती खाणार