भाजपाने माघार घेतल्याने ठाकरे गटाच्या ऋतूजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यात मनसेचे नेते राज ठाकरे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असे म्हटले होते. यानंतर भाजप काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता भाजपने आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा प्रदेशध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवत नसल्याचं भाजपने सांगितलं आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतूजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असे म्हणावे लागले.