अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी सहा जणावर कार्यवाही ३६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

औसा – प्रतिनिधी
औसा तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विकली जात असल्याच्या तक्रारी अनेक गावात ऐकायला मिळतात.विशेष म्हणजे बंद दिवशी हि दारु मिळते यावर पोलिसांनी धाडी टाकल्या असून १९ फेब्रुवारी रोजी नागरसोगा व बोरफळ येथे धाडी टाकून सहा जणावर करवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदाराचे वेगवेगळे पथक नेमून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान दिनांक 19/02/2023 रोजी विक्रीवर निर्बंध असतानाही काही इसम देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठीक ठिकाणी छापेमारी करून देशीदारूची अवैध व विनापास, परवाना चोरटी विक्री व्यवसाय करीत असताना, देशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या औसा तालुक्यातील एकूण 6 इसमांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी विदेशी दारूचा 36 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे औसा येथे या सर्वजणा विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये
महादू गौतम चाबुकस्वार, वय 30 वर्ष, राहणार नागरसोगा अशोक शिवराम चाबुकस्वार, वय 59 वर्ष, राहणार नागरसोगा ओम प्रकाश दत्तात्रेय मसलकर ,वय 30 वर्ष, राहणार नागरसोगा ! रावण तुकाराम गायकवाड, वय 65 वर्ष, राहणार बोरफळ दत्ता बब्रुवान मांजरे ,वय 24 वर्ष, राहणार बोरफळ व्यंकट नारायण ढोले, वय 65 वर्ष, राहणार बोरफळ यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 19/02/2023 रोजी औसा पोलीस ठाणे हद्दीत दिवसभर चाललेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचे नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड , इक्बासदरा ेख, पोलीस अमलदार दिनेश गवळी, नितीन सगर, गंगाधर सूर्यवंशी, भरत भुरे, राहुल डांगे, महारुद्र डिगे, समीर शेख, नवनाथ चामे,मदार बोपले यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!