शिवलिंगेश्वर फार्मसीमध्ये शिवजयंती निमित्त भव्य प्रतिमेचे अनावरण व ‘शिवसंग्रालयाचे उद्घाटन’

औसा (प्रतिनिधी) तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल, ब्ल्यू बर्ड ज्युनीअर सायन्स कॉलेज, विश्वेश्वरय्या औद्यौगीक प्रशिक्षण संस्था मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ढोल ताशा, लेझिम, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी, संगीत, गजर घोषणा व टाळयंाच्या गजरात, पालखीची मिरवनुक काढुन मोठया उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सुरुवातीला शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्या स्वाती कापसे, प्राचार्य गोपाळ दंडिमे यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नविन प्रतिमेचे अनावरन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी योगेश्वर धाराशिवे, प्रा.दिनेश गुजराथी, विभाग प्रमुख प्रशांत धुमाळ, प्रविण साबदे, डॉ.सुरज मालपानी, कापसे विद्या, रेवण बुक्का, मंगेश बिडवे, अंकुश बिडवे, संदेश माडे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन हंगरगेकर उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव चे औचित्य साधुन महाविद्यालयात संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ मिळावा याकरीता ‘कमवा व शिका’ ही योजना सुरु करण्यात आल्याचे संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी जाहिर करुन महाविद्यालयत शिवसंग्रालयाचे उद्घाटन केले. या संग्रालयात ढाल, तलवार, छायाचित्रे, ऐतेहासिक पुस्तके व ग्रंथाचा समावेश आहे. कार्यक्रमात विद्याथ्र्यांमधुन विजय सरवदे व गायत्री वाघमारे या विद्याथ्र्यांनी शिवरायांची गौरवगाथा उपस्थितांना सांगितली तर शिवकन्या पिटले या विद्यार्थीनीने स्वत:च्या हातांनी विणलेली शिवरांयाचे नाव असलेली शॅाल संस्थचे सचिव बसवराज धाराशिवे यांना भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजाप्रती असलेली भक्ती, प्रेम व आदर भावनेने दररोज न विसरता पुष्पमाळ अपर्ण करत असल्यामुळे तीचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
सदरील शिवजयंती जन्मोत्सव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुरज मालपानी यांनी केले. या कार्यक्रमास युवराज काटु, गणेश गोसावी योगेश माशळकर, अब्दुल काझी, विकास मुगळे, किरण रोडगे, चंद्रवंशी मयुरी, डॉ. अजय फुगटे, डॉ. मोहम्मद रईस, कविता सिरगिरे, सुर्यवंशी अनुजा, सय्यद ए. ए., सय्यद सादत, गोपाळ माळी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.