उमरगा / लोहारा : श्रीमद् उज्जयीनी सध्दर्म सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी व श्रीमद् काशी सध्दर्म सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात 84 वा वार्षिक महोत्सव, शिवदिक्षा सोहळा, अखंड शिवनाम सप्ताह, महापूजा आणि जगद्गुरूंचे आशिर्वचनाचा भव्यदिव्य कार्यक्रम हिरेमठ संस्थान औसा येथे दिनांक 23 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत संपन्न झाला. सदर सोहळ्याचा लाभ व उपस्थित महास्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी
*दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू* यांचे *स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी* यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी उपरोक्त जगद्गुरुंचे दर्शन तर घेतलेच शिवाय येत्या आक्टोंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकित विजयी होण्याचा आशीर्वाद मागितला त्यावेळी जगद्गुरूंनी ” विजयी भव ”
असा आशीर्वाद देऊन आपण नक्किच विजयी व्हाल, आमचा व आमच्या संपुर्ण धर्मपीठाचा आपणास पाठिंबा आहे. असा आशीर्वाद देऊन महास्वामीजींनी सातलिंग स्वामी यांचा शाल घालून सत्कार केला. याप्रसंगी श्री ष. ब्र. 108 डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, मठाधिपती, हिरेमठ संस्थान, औसा, श्री. ष. ब्र. 108 निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी मैंदर्गी, श्री. ष. ब्र. 108 श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर आदि महाराजांसह बहुसंख्य भाविक भक्तगण उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!