वडाचा तांडा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा महिलराज

तुळजापुर : वडाचा तांडा तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ निमाबाई राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे दि 10 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या निवडीमध्ये सौ ललिता जयराम चव्हाण यांचा विहित वेळेत एकमेव अर्ज आल्याने त्यांना ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बिनविरोध जाहीर करण्यात आले . यापूर्वी सन 2019 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंच म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ विजया राजू चव्हाण व त्यानंतर उपसरपंच म्हणून अवघ्या एका मताने सौ निमाबाई बाबु राठोड यांची निवड करण्यात आली होती.तदनंतर पुन्हा एकदा उपसरपंच म्हणून महिलांना प्राधान्य देताना सौ. ललिता जयराम चव्हाण यांची निवड करण्यात आली. यामुळे वडाचा तांडा येथे पुन्हा एकदा महिलाराज दिसून आले आहे.सदर निवडी वेळी अध्यासी अधिकारी ऐ सी कावळे साहेब,ग्रामसेवक विनेश कांबळे, सरपंच सौ विजया चव्हाण,माजी उपसरपंच निमाबाई राठोड, नवनीत उपसरपंच ललिता चव्हाण, ग्रा पं सदस्य चांगुणा चव्हाण, लखन चव्हाण, अक्षय राठोड, ऑपरेटर नकुल वाघमारे,शिपाई आनंदा राठोड, इत्यादी उपस्थित होते. निवडी नंतर सौ ललिता चव्हाण यांच्या सत्कार करून आनंद व्यक्त करण्यात आला.