धाराशिवराजकीय

माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या कानेगावात भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात

लोहारा (जि. धाराशिव) : विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचा लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे नितीन पाटील मित्र परिवारातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमस्थळी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या विजयामुळे परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जनसामान्यांशी असलेले त्यांचे नाते, विकासाभिमुख भूमिका आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेले कार्य यामुळेच मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याचे वक्त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई जानकर, उपसभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनीताई पाटील, माजी उपसरपंच नितीन पाटील, आनंद पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वाघमारे, नगरसेवक दीपक मुळे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, सिद्रामप्पा दुलंगे, प्रशांत काळे, बळवंत पाटील, सुनिताताई कदम, सुरेश पाटील, श्रीमंत पाटील, संतोष फावडे, विनोद मोरे, अमोल ओवांडकर, आप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने कानेगाव परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी बसवराज पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाकडून विकासाच्या नव्या अपेक्षा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!