धाराशिव
भातागळी येथे होणार खासदार, आमदारांचा सत्कार

लोहारा ( धाराशिव ) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भातागळी तालुका लोहारा येथे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील ,आमदार प्रवीण स्वामी यांचा नागरी सत्कार व शंभू महादेवाच्यामहापूजेचे आयोजन.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर तर विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या नागरी सत्काराचे दिनांक 5 जानेवारी सायंकाळी सहा वाजता भातागळी तालुका लोहारा येथे आयोजन करण्यात आले असून त्याच वेळेस ग्रामदैवत शंभो महादेवाची महापूजा तसेच नवस पूर्ती निमित्त नंदी सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या तसेच शंभू महादेवाच्या भक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान सत्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाबा पाटील, राजू तोडकरी, नवरदेव कदम ,दीपक भैया जवळगे, दिलीप भालेराव , प्रकाश आष्टी, आश्लेष भैया मोरे, रजाक अत्तर, सलीम शेख ,डॉक्टर लक्ष्मण आसबे , भातागळी गावच्या सरपंच सुषमा माने तसेच भातागळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जगताप हे राहणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जगताप ,मुकुंद जगताप, तानाजी आनंदगावकर, गणेश फत्तेपुरे ,महादेव आनंदगावकर, फुलचंद जगताप व समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.



