लोहारा ( धाराशिव ) : केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेचा महत्वाचा टप्पा म्हणजे हागणदारीमुक्त गाव हि संकल्पना गावातील नागरिकांनी वैयक्तिक शौचालयचा वापर अंमलात आणून आपले गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहन लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती शीतल खिंडे पवार यांनी केले आहे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या आदेशानुसार जल जिवन मिशन प्रकल्प संचालक मनोज राऊतयांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील बांधकाम केलेल्या शोचालयाचा वापर करणे, एक शोषखड्डा असलेल्या शोचलयास दुसरा शोषखड्डा करण्यास भाग पाडणे, सेफ्टी टँक असलेल्या शौचलयास नवीन शोषखड्डा करून त्यास जोडून घेणे या कामास गति देण्यासाठी ग्रामीण भागात गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आली आहेत. शुक्रवार दिनांक 3जानेवारी रोजी पहाटे 05.30 ते 06.30 वाजे पर्यंत सहायक गट विकास अधिकारी वग्गे जे. टी., ग्राम पंचायत अधिकारी तानाजी घंटे, वाहन चालक उस्मान मुल्ला यांनी मोघा, व बेलवाडी या गावात उघड्यावर शौच विधी करणाऱ्या ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे प्रबोधन केले.
तालुक्यात जिल्हा परिषद गट निहाय गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले असून जेवळी गटासाठी बेले एम. पि.कनिष्ठ अभियंता, सास्तूर गटासाठी निंबाळकर के.डी. कृषी अधिकारी, कानेगाव गटासाठी लोखंडे बी. यू. विस्तार अधिकारी, माकणी गटास पद्मराज गडदे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी ग्राम पंचायत सदस्य यांनी या कामी पुढाकार घेऊन गावातील सर्व प्रकारच्या शोचलयाचा नियमित वापर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून ग्रामीण भागातील उघड्यावर शौच विधी जाण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आपल्या गावातील स्वच्छ्ता अबाधित ठेवण्यासाठी तसेच साथीचे आजार पसरू नये साठी गावातील सर्व नागरिकांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा तसेच जे कुटुंब अद्याप शौचालयपासून वंचित आहेत त्यांनी पंचायत समिती कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत किंवा शासनच्या https://www.msdhulap.com/online-application-started-for-personal-toilet-scheme/ या वेबसाईड वरती अर्ज सादर करावा असे आवाहन लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती शीतल खिंडे –पवार यांनी केले आहे.