गुळ पावडर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम संपन्न

इकबाल मुल्ला

विशेष प्रतिनिधी / लोकशक्ती न्यूज
रूपामाता नॅचरल शुगर संचलित युनिट क्रमांक 2, रुपामाता पावर लिमिटेड या नूतन गूळ पावडर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम नुकताच रोषणपुरी ता.माजलगाव येथे पार पडला.उस्मानाबाद जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या रुपामाता उद्योगसमूहाने या कारखान्याच्या रूपाने बीड जिल्ह्यात यशस्वी पाऊल ठेवले आहे,रुपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली रुपामाता ग्रुप पूर्ण महाराष्ट्रात आपली नवी ओळख बनवत आहे.यांच्या अथक परिश्रमाने उस्मानाबाद जिल्ह्यात रूपामात अग्रेसर आहे.शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन,शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवून,त्याचा आर्थिक विकास हेच रुपामाताचे ब्रीदवाक्य आहे,हीच विकासाची गंगा बीड जिल्ह्यातील अखंडपणे वाहत राहील अशा शब्दात या कारखान्याचे संचालक ॲड. अजित व्यंकटराव गुंड यांनी मनोगत व्यक्त केले.बँकिंग,उद्योग, दुग्ध उद्योग या रूपाने तरुणांना रोजगार,तसेच शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आमचा समूह कार्यरत आहे, यापुढे सर्वांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी सांगितले.कोरोना काळात सर्व जग थांबले होते पण रुपामाता पॉवरचे काम थांबले नाही..माझ्या सहकाऱ्यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नामुळेच आज या कारखान्याचे काम पूर्णत्वास आले आहे व मोळीपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत,असे रुपामाता पॉवरचे संचालक भाऊसाहेब गुंड यांनी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले.

तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या वेळी मान्यवरांनी रुपामाता पॉवरला पुढील काळातील प्रगतीसाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या
यावेळी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब गुंड,रोषणपुरी गावचे सरपंच मुक्तिराम अण्णा ताकट,माजी सरपंच उद्धव काका ताकट, केदारेश्वर बँकेचे चेअरमन भगवान नाना कदम, पूनंदगावचे माजी सरपंच शेषेराव अण्णा खडे, रोषणपूरी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुखदेव ताकट,चीफ इंजिनिअर प्रकाश गुंड,चीफ केमिस्ट बालाजी कुलकर्णी,बॉयलर इंजिनिअर लाखे,सिव्हिल इंजिनीअर राठोड,शेतकी अधिकारी मुलाणी,ऊस पुरवठा अधिकारी नाटकर, यांच्यासह शेतकरी, ऊसतोड ठेकेदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!