कृषी जल्लोष 2023 मध्ये लोहारा तालुक्याचा बोलबाला

उस्मानाबाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी या तीन दिवसाच्या कालावधीत कृषी जल्लोष 2023 कार्यक्रम उस्मानाबाद शहरात आयोजित करण्यात आला होता.             सदर कार्यक्रमात क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल,कबड्डी,रस्सीखेच, 100मी धावणे,400मी धावणे,लांब उडी,गोळा फेक,बॅडमिंटन,टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी मैदानी खेळ तर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,पाक कला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये वैयक्तिक गायन,नृत्य स्पर्धा व सामूहिक गायन,नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
सदर कृषी जल्लोष 2023 मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहारा टीम ने मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 12 बक्षिसा वरती आपले नाव कोरले ते खालील प्रमाणे –


1.सामूहिक पथ संचालन – द्वितीय क्रमांक
2. बुद्धिबळ – प्रथम क्रमांक(गयाप्रसाद सगर)
3.धावणे 400मी – प्रथम क्रमांक(माधव बिराजदार)
4.धावणे 100मी – द्वितीय क्रमांक (माधव बिराजदार)
5. कॅरम – द्वितीय क्रमांक(सागर पीचे)
6. गायन – सचिन पवार
7.गायन – मिलिंद बिडबाग
8.क्रिकेट सामनावीर – जनार्दन गोसावी.
9.क्रिकेट सामनावीर – शैलेश जट्टे
10.सामूहिक नृत्य स्पर्धा – द्वितीय क्रमांक
11. क्रिकेट – उपविजेता
12. कबड्डी – उपविजेता
वरील विजयात मंडळ कृषी अधिकारी श्री डी बी रीतापुरे,श्री शिवाजी ताराळकर यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!