विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

लोहारा : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास परिसरातील जवळपास पाचशेवर माता पालकांनी सहभाग नोंदवला. शाळेमध्ये हळदी कुंकवा निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये संगीत खुर्ची, धावणे , बकेटमध्ये बॉल टाकने अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वच महिलांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला. आजची कणखर स्त्री या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये बऱ्याच महीलांनी आपले मनेगत व्यक्त केले. व तसेच स्त्री ची खरी कहाणी या विषयावर शाळेतील श्रेया साळुंखे या मुलीने आपल्या भाषणातून सर्वांची मने हे लावून टाकली. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी आजची कणखर स्त्री व अंधश्रद्धा, रुढी, परंपरा ,स्त्रियांची कामगिरी व कर्तत्व अशा बऱ्याच विषयावर मार्गदर्शन केले. हळदी कुंकवाचे वाण म्हणून कुंडी हे वाण लुटण्यात आले जेणेकरून समाजामध्ये वृक्ष लागवडीचे भावना जागृत होईल.

हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेवळे यांनी केले. तर आभार ओम सूर्यवंशी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!