मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष यांचा शिवसेनेत प्रवेश

उमरगा : आज आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवानेते किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष शाहुराज सुरेश सावंत यांनी व येणेगुर ता.उमरगा येथील चंद्रकांत बळीराम कांबळे, सुमित अशोक बनसोडे, त्रिशरण विश्वनाथ गायकवाड, बसवराज मल्लिनाथ कासते, सिद्धेश्वर हनुमंत गुळाळे, बाबूलाल गुडूसाब शेख, गुडूसाब इसाक शेख, उमेश काशिनाथ धामशेट्टी, रवी मल्लिनाथ कास्ते, धनराज सुरेश सावंत, शिवाजी राजेंद्र सुरवसे, नितीन किशोर गायकवाड, सतीश दिलीप गायकवाड, विकास विश्वनाथ गायकवाड, मंगेश विठ्ठल गायकवाड आदी मनसैनिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला .

याप्रसंगी शहर प्रमुख योगेश तपसाळे, बाजार समिती संचालक सचिन जाधव, येणेगुर विभाग प्रमुख महादेव बिराजदार, वासु कलशेट्टी, विधानसभा संघटक शरद पवार, संदीप चौगुले, शिवसेना शहर
प्रमुख अमर शिंदे, भगत माळी, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर सोनकटाळे, शाखाप्रमुख गणेश माळी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!