श्री बसवेश्वर विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा उत्साहत संपन्न

सुधीर कोरे
जेवळी, ता. लोहारा
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा उत्साहत पार पडली. यावेळी सकाळी कडाक्याच्या थंडीतही जेवळीसह, परिसरातील विद्यार्थ्थांनी उत्सपूर्त सहभाग नोंदविला.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा रविवारी (ता.२२) पार पडली. गेली ३७ वर्षे सातत्याने एकाच दिवशी, एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून ‘सकाळ-चित्रकला स्पर्धे’ची सर्वत्र ख्याती आहे. जेवळी येथे ही स्पर्धा येथील बसवेश्वर विद्यालयाच्या मैदानावर आयोजीत करण्यात आले होती. या स्पर्धेचे उद्घाटन या संस्थेचे अध्यक्ष अशोकराव भुसणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकाकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे. जेवळीसह परीसरातील विविध शाळेतून चार गटातून एकून २१९ विद्यार्थ्थांनी यात सहभाग नोंदविला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय गाडेकर, प्राचार्य दयानंद कापसे, मुख्याध्यापक यादव कांबळे, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य भोजप्पा कारभारी, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, शिवबसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव कारभारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक धनराज बिराजदार, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष पंडित कार्ले, सचिव एच ए कदम, संचालक दयानंद भुजबळ, सुनील चवले आदींनी या परिक्षा केंद्राला भेट देऊन बालचित्रकारांचे कौतुक केले.
यावेळी केंद्र संचालक म्हणून चित्रकला शिक्षक व्ही बी बचाटे यांनी काम पहिले. हे चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी सकाळचे बातमीदार सुधीर कोरे, शिक्षक आर डी लामजने, एस एस कारभारी, आर व्ही पाटील, एस डी पोतदार, एस जी ढोबळे, एस एन बिराजदार, एस एस ढोबळे, पी जी कारभारी, एस एम चेंडके, जी बी मडोळे, एम टी डोईफोडे, आण्णप्पा सर्जे, ए जी हिवाळे, सी टी मोठे, व्ही एम कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतला आहे.
शिवबसव प्रतिष्टानचे अध्यक्ष महादेव कारभारी व संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक धनराज बिराजदार यांच्या वतीने या विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.