शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून ३० हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प

लोहारा : आज सोमवारी मा. शिवसेनाप्रमुख सरपसेनापती हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोहारा शहरातील स्वराजली मोटार्स येथे प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेस माजी सभापती विलास भंडारे, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल व माजी शिवसेना तालुकाप्रमुख रवि कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोहारा तालुक्यात सदस्य नोंदणी अभियानाचा शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख व माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी यांच्या हस्ते अर्ज भरुन शुभारंभ करण्यात आला.
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन म्हणुन लोहारा तालुक्यातून तीस हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थित शिवसैनीकांनी केला.यावेळी बोलताना युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सर्वानी यासाठी सर्वतोपरी तनमनाने १००% योगदान देण्याचे आवाहण केले.
यावेळी उपस्थित माजी सभापती विलास भंडारे,शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहप्रमुख सलीम शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच नामदेव लोभे,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,सरपंच सचिन गोरे,माजी नगरसेवक शाम नारायणकर,माजी शिवसेना ता.प्रमुख रवि कुलकर्णी,माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी,मोहम्मद हिप्परगे,महादेव पवार,आकाश जावळे,रघुविर घोडके,किरण पाटिल,बालाजी माशाळकर,महेश बिराजदार,सिद्धेश्वर गिराम,नरसिंग जाधव,अक्षय नारायणकर,अविनाश रसाळ,पांडुरंग कुंभार,उत्तम चव्हाण,नितिन कारभारी,प्रकाश बुआ,गणपत पाटिल,मैनुद्दिन शेख यासह शिवसैनीक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.