कर्तव्यपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाची झलक

मुंबई : यंदाच्या कर्तव्य पथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही आहे. हा चित्ररथ ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यावर साकारण्यात आला आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.