कबड्डीमध्ये प्रथम क्रंमाक पटकावल्याने ग्रामपंचायतच्या वतीने खेळाडूंचा सत्कार

लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती (बु.) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचा मुलीचा संघ जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये प्रथम क्रंमाक पटकावल्याने ग्रामपंचायतच्या वतीने शनिवारी खेळाडूंचा ट्रॅक्टरमध्ये गावातुन मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अखिल तांबोळी, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालयीन विस्ताधिकरी भास्कर बेशकराव, लोहारा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे , सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम साबळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर साबळे, नंदू वाळके,शिक्षक बालाजी सोमवंशी,नितिन वाघमारे, अनंत सुतार, के.एस. गायकवाड, व्ही.आर.पोतदार, एस.टी.पोतदार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कबड्डी संघाची कर्णधार पुनम सुधाकर परसे, निकिता फुलचंद भरगांडे, प्रतीक्षा लहू भंडारे, राधिका मलिकार्जुन कुंभार, भाग्यश्री बालाजी कोळी, सानिया अकबर मुल्ला, राठोड वर्षा सुधाकर, पूजा कोळी, प्रियंका कदम, वैष्णवी मुंडे,भाग्यश्री कोळी, संस्कृती घोडके प्रणाली भंडारे, वैष्णवी कदम व गुरुजीचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्याना मार्गदर्शक नितीन कदम ,प्रविण अगंबरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण अगंबरे यांनी केले.सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले. तर आभार के.एस. गायकवाड यांनी मानले.