युवक महोत्सवात भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाची यशस्वी कामगिरी

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील भानुदास चव्हाण महाविद्यालयातील विजेत्या संघाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रदीप चव्हाण यांनी अभिनंदन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद युवक महोत्सव 2022 मध्ये महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेला उत्कृष्ठ संहिता लेखन प्रकारात तृतीय पारितोषिक मिळाले. महाविद्यालयातील संघाने शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन – सुरवाद्य, आणि तालवाद्य, सुगम गायन (भारतीय), समूहगीत, आंबेडकरी जलसा, लावणी, ‘उस्मानाबाद टू पाकिस्तान’ एकांकिका, गोधळ, वक्तृत्व, वाद विवाद, काव्य वाचन, भजन, मुकाभिनय, लोकनृत्य अशा सांघिक ८ आणि एकल ८ एकूण १६ कलाप्रकार सहभाग नोंदवून उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे,प्राचार्य घोलकर आदींनी युवक महोत्सव संघाचे, संघप्रमुखांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!