शिक्षक आमदार विक्रम काळे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

लोहारा : लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मी कटीबद्ध असून ती लागू केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, यापुर्वी देखील विविध आंदोलनातून शासन दरबारी जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न लावून धरला आहे यापुढे त्या साठी तिव्र लढा दिला जाईल.यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे.
शिक्षकांच्या सर्वच प्रश्नासाठी सातत्याने लढा दिला आहे आणि देत राहणार यासाठी तुम्हा सर्वांच्या मतदान रुपी आशीर्वादाची गरज आहे, तुम्ही मला पहिल्या पसंतीचे मत द्याल असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन केले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत विद्यालय माकणीचे प्राचार्य राम जाधव हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकध्यक्ष सुनील साळुंखे,माजी सरपंच नागण्णा वकील, माजी जि.प. सदस्य दीपक जवळगे, हिप्परगा (रवा) उपसरपंच विजयकुमार लोमटे, लोहारा नगरपंचायतचे उपनगरध्यक्ष आयुब शेख,नगरसेवक विजयकुमर ढगे, जालिंदर कोकणे,हरी लोखंडे,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके माजी ग्रा.पं.चे माजी सदस्य मेहबूब गवंडी माजी नगरसेवक श्याम नारायणकर, लोहारा तालुका जुक्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा.श्री काळे, सचिव प्रा.शिंदे, प्रा.बहिरे, डोंबाळे, नादरगे, कुंभार, गायकवाड, अशोक वाघमारे,भोसले सर, स्वामी सर व तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक मतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जी.डी. मैंदाड यांनी केले, सुत्रसंचालन कु.सानिका बादुले हिने केले.तर उपस्थितांचे आभार प्राचार्य घोलकर सर यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे,समाजवादी पार्टी, व रिपाईच्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी लोहारा तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातून विक्रमी मतांनी आमदार विक्रम काळेंना आघाडी देण्याचा निर्धार केला.