हळदी – कुंकू कार्यक्रम व मातापालक मेळावा निमित्ताने

🌹🌹नारीशक्ती🌹🌹
गरुडभरारी कर्तृत्वाची
घेऊनी उडते उंच अंबरी
विधात्याच्या सुंदर कलाकृतीची
अलौकिक शक्ती नारी भारी ;
पुष्पासम कोमल असुनि
प्रसंगी कणखर बनुनि हिरकणी ,
प्रेम अन् वात्सल्याची मूर्ती
तितिक्षेमधुनी बहरते हर मनी ;
ऋजुता वसते ठायी ठायी
पण नेतृत्वाची देते ग्वाही ,
कोणत्या ना कोणत्या रुपी
नारी शक्ती पुरुषांमागे उभी राही ;
वक्रदृष्टिने पाहता कोणी
सज्ज ठेवते नयनांची समशेर,
शत्रूने अगदी हार मानावी
नारी शक्तीसमोर अखेर .
सौ . मधुबाला नरेंद्र औटे
जि.प. प्राथ . शाळा लोहारा खुर्द