अपयशाने खचून न जाता सातत्याने कार्य केल्यास यश नक्कीच मिळते – राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे

लोहारा : लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलला राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री उमेश खोसे यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांचे स्कुलतर्फे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सहकारी श्री किशोर चौधरी यांनी श्री उमेश खोसे यांच्या कार्याविषयी माहिती देताना सांगितले की त्यांना तंत्र स्नेही शिक्षक म्हणून राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार, आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत, विद्यार्थ्यासाठी त्यांनी बोली भाषेत स्वतः पुस्तकतयार केले असून, 51शैक्षणिक ॲप तयार केले आहेत. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यासाठी शिक्षण सप्ताह यासारखे नवनवीन उपक्रम राबवून, सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले आहे. याप्रसंगी स्कूलमधील उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिक्षकांनी सदैव सकारात्मक विचार केले पाहिजे, शासनाच्या नवनवीन योजना व उपक्रम शाळेत राबविताना अनेकवेळा अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करून आहे
त्या परिस्थितीशी स्वतः संघर्ष करून विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे कार्य करावे, कारण ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन, भौतिक सुविधा उपलब्ध नसल्या तरी त्यांच्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची, त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.शिक्षकांनी शाळेतील सर्वच विद्यार्थी याची जबाबदारी आपली आहे असे समजून स्वतःच्या कल्कपक्तेतून निस्वार्थ कार्य करावे.एखादा सर्कशीतला सिंह ज्याप्रमाणे फक्त रिंग मास्टर समोरच आपले सर्व कला दाखवतो तसे कागदावर दिसण्यापूरते काम न करता संपूर्ण शाळा व शाळेतील सर्वच विद्यार्थी याची जबाबदारी आपली आहे या जाणिवेतून जंगलाचा राजा असलेल्या सिंहासारखे स्वतःचे अस्तित्व व विश्व निर्माण करावे.
याप्रसंगी स्कूलच्या संचालिका सौ सविता जाधव, श्री सिद्धेश्वर सुरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, श्री सोमनाथ कुसळकर, श्री प्रेमदास राठोड, मीरा माने, संतोषी घंटे, संचिता बाचपल्ले, सरिता पवार, माधवी होगाडे, मयुरी नारायणकर, चांदबी चाऊस, स्वामींनी होंडराव निलोफर बागवान यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.