हळदी – कुंकू कार्यक्रमात अकराशे रोपाचे महीलांना वाटप


लोहारा ( जि.धाराशिव ) : प्रति वर्षाप्रमाणे सचिन ज्वेलर्स माकणी शाखा – माकणी (ता.लोहारा) हळदी – कुंकू कार्यक्रम 10 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आला होता.

त्याप्रसंगी परिसरातील अकराशे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये अकराशे रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महीलांनी आम्ही झाडाचे संगोपन करु असे आश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन ज्वेलर्सच्या टीमने परीश्रम घेतले.




