महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे लोहारा येथे दोन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ

लोहारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा यांच्यावतीने मकर संक्रांत निमित्त परिवर्तन महिला प्रभागसंघ कानेगाव अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे दोन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.
गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी.सौ.शितल खिंडे गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहारा यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अलंकार बनसोडे यांच्या प्रयत्नातून लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी बनवलेल्या वस्तुंचे दोन दिवसीय विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सूर्यकांत भुजबळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शाम गोडभरले यांनी केले. विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहारा सौ.शितल खिंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी पंचायत संजय ढाकणे,तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अलंकार बनसोडे तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड,तालुका समन्वयक राहुल मोहरे,प्रभाग समन्वयक सौरभ जगताप,प्रभाग समन्वयक अंतेश्वर माळी,प्रभाग समन्वयक प्रदीप चव्हाण,प्रभाग समन्वयक शिवशंकर कांबळे, प्रशासन सहाय्यक रामेश्वर दुर्गुळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागसंघ व्यवस्थापक मंगल गायकवाड,प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड,प्रभाग पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी समुदाय संसाधन व्यक्ती संगीता कांबळे,लक्ष्मी मोरे,प्रतिभा परसे,गोकर्णा घोडके, नाझरेकर ताई,उज्वला पवार,त्रिशला गायकवाड,कविता पवार,बालिका मोरे,शैला गोरे व 15 स्वयंसहाय्यता समूहातील उद्योजक महिला यांनी महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.