स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम योजना

उस्मानाबाद : ‘आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक’ हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन इयत्ता 8 वी, 9 वी वर्गातील विद्यार्थ्यांकरीता केंद्र शासनाने सन- 2018 पासून ‘स्टुडंट पोलीस कॅडेट योजना’ सुरु केली आहे. या योजनेतून विद्यार्थी व पोलीस यांच्या बंध निर्माण होउन कायदा व सुवव्यवस्थाव, सार्वजनिक शांतता राखण्यास आवश्यक असा सदृढ समाज निर्मीती शक्य होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 36 जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची या योजनेत निवड करण्यात आली असून उस्मानाबाद पोलीस संबंधीत शाळांना वेळोवेळी भेटी देउन योजने अंतर्गत विविध उपक्रम आयोजीत करतात.

या योजने अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतून आज दि. 23.11.2022 रोजी वडगाव (सि.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पोलीस मुख्यालयास भेट आयोजीत करण्यात आली. पोलीस दलातील नियंत्रण कक्ष, शस्त्रागार, बिनतारी संदेश, व्यायाम शाळा, जिल्हा विशेष शाखा, सायबर सेल, पोलीस कवायत मैदान या ठिकाणी नेउन पोलीस दलाची तोंड ओळख करुन देण्यात आली.

यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, सपोनि- श्री. यशवंत बारवकर, श्रीकांत भराटे, पोउपनि- श्रीमती हिना शेख, पोना- अतिश सरफाळे यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार नमूद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होता.
दरम्यान विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ योजना अंतर्गत पुरुष व महिला पोलीस अंमलदारांनी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला.

विद्यालय परिसरातील छेडछाडीस आळा घालण्यासाठी पोलीस काका व पोलीस दिदी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करुन लैंगीक छळा संबंधीच्या भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमातील तरतुदींसोबतच गुड टच-बॅड टच, डायल 112 मदत वाहिनी, वाहतुक नियम इत्यांदीसह समाज माध्यमांतील गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!