कलाटे फाऊंडेशनची दिनदर्शिका जीवनाला आकार देणारी – शंकर जगताप

वाकड : (प्रतिनिधी) दिवसाचे, वेळेचे आणि येणाऱ्या काळाचे योग्य नियोजन करण्यास भाग पाडत प्रत्येक कुटुंबाच्या यशाची गुरुकिल्ली बनलेली कलाटे फाउंडेशनची दिनदर्शिका जीवनाला योग्य आकार देणारी मार्गदर्शक असल्याचे मत चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी वाकड येथे
व्यक्त केले. रणजीत आबा कलाटे फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांच्या वतीने दरवर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या नव वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून, शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व संतोष कलाटे यांच्या नियोजनात २०२३ नव वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. यावेळी
फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे, रणजीत कलाटे, विशाखा भागवत, अक्षदा शेडगे, विशाल शेडगे, मोबीन पठाण, तानाजी बारणे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित नागरिकांना शंकर जगताप व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले.
दिनविशेष, सणसनावळ, पंचांगण, राशिभविष्य, महिलांसाठी अनेक पाककृती, यासह दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त व इत्यंभूत माहितीचा खजिना असलेल्या या दिनदर्शिकेत स्नेहा कलाटे यांनी आजवर केलेल्या सामाजिक व कार्याचा व उपक्रमांचा आढावा छणचित्रांच्या माध्यमातून अतिशय आकर्षक पद्धतीने घेण्यात आला आहे. त्याचेही शंकर जगताप यांनी कौतुक केले. या दिनदर्शिकेच्या सुमारे २५ हजार प्रती वाकड व पिंपळे निलख परिसरातील घरोघरी वितरित होणार असल्याचे स्नेहा कलाटे यांनी सांगितले.