धाराशिव

लोहाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक सलोख्याने रस वाटप

 

लोहारा | प्रतिनिधी 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा संदेश देत रस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम जब्बार मुल्ला यांच्या वतीने संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नगरसेवक अविनाश माळी यांच्या हस्ते पुजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक गौस मोमिन, जालिंदर कोकणे, विजयकुमार ढगे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, दादाभाई मुल्ला, आदम मुल्ला, महादेव कांबळे, तुळशीराम कांबळे, सुनिल कांबळे, प्रितम शिंदे, बाळु शिंदे, मिलिंद नांगवंशी, प्राचार्य शहाजी जाधव, पुरुषोत्तम सितापुरे, लक्ष्मण रोडगे, दत्ता रोडगे यांच्यासह शहरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून सामाजिक ऐक्य व बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!