शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी व दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी यांच्या वतीने आलमला येथे एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन

औसा : (प्रतिनिधी) जागतिक एड्स दिन निमित्त आलमला येथे दि. 01 डिसेंबर 2022 वार गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी,दगडेाजीराव देशमुख डी. फार्मसी, आलमला, तालुका आरोग्य विभाग, उपकेंद्र आलमला व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एस. देवणीकर व महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले. यावेळी आलमला गावचे सरपंच कैलास निलंगेकर, डॉ. महेश पवार, वैद्यकीय अधिकारी भादा, डॉ. समीर शफी, डॉ. संतोष पाटील, शिवशंकर वागदरे, डॉ. सूरज मालपानी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन हंगरगेकर, विकास मुगळे, गणेश गोसावी इत्यादी उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटय, संदेश फलक व घोषणांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन रोगासंदर्भात जनजागरण केले. रॅलीद्वारे एड्स विषयी नागरीकांच्या मनात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रॅलीचा समारोप कार्यक्रम आलमला ग्रामपंचायत कार्यालय समोर करण्यात आला.
डॉ. देवणीकर आर.एस., तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपले मत व्यक्त करताना सुरुवातीलाच संस्थेच्या सामाजीक कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. एड्स सारख्या विविध रोगाबद्दल ग्रामीण भागात व असुशिक्षीत लोकांकरीता मागदर्शन शिबीराचे आयोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्याथ्र्यांनी सुसंस्कृतपणा संयम बाळगून जीवन जगावे, एक ध्येय समोर ठेवुन कार्य करावे आणि माणुस म्हणुन जगत असताना समाजात स्त्रीचा आदर करा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. बळीराम लवटे यांनी मानले तर सुत्रसंचालन डॉ. सुरज मालपानी यांनी केले. या कार्यक्रमास प्रमिला शिंदे, शिवाजी टोंपे, बंडे ए.जी. श्रध्दा सुरवसे, शारदा पुणे, दीक्षा आग्रे, मयुरी सुर्यवंशी, कांबळे प्रगती, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.