स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या सेवाभावाला सलाम…

लोहारा (जि.उस्मानाबाद ) : गेली 22 वर्षापासून स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवीत आहे. दर्जेदार आरोग्य सेवे बरोबरच रुग्णांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाते त्यामुळे तीन जिल्ह्यामधून जवळपास ४५५ गावामधून रुग्ण स्पर्शच्या सेवेचा लाभ घेतात विशेषतः महिलांसाठी स्पर्श हे हक्काचे माहेर घर बनले आहे.
त्यामुळेच जवळपास बाह्यरुग्ण विभागाच्या व आंतररुग्ण विभागानुसार ७१% महिला स्पर्शच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतात. सर्व रुग्णांना सकस आहार दिला जातो व त्याबरोबर गरोदर महिला व प्रसूती पश्च्यात महिला यांना विशेष प्रोटीन युक्त सकस आहार दिला जातो. कोविड-१९ च्या महामारीत स्पर्श मार्फत अनेक गरजू गरीब कुटुंबाना कोविड-१९ महामारीत रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अशा कुटुंबाना स्पर्श सास्तूर मार्फत समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच एच.आय.व्ही. बाधित ८५ निराधार बालकांना स्पर्श मार्फत दरमहा सकस आहार वाटप करण्यात येतो.

HTML img Tag Simply Easy Learning

उमरगा-लोहारा तालुक्यातील ३८ क्षय रुग्णांना स्पर्शने दत्तक घेण्यात आले आहे. अशा रुग्णांना दरमहिन्याला अन्नधान्य दिले जाते. जेणेकरून त्यांना सकस आहार मिळून लवकरात लवकर त्यांना क्षयरोगापासून मुक्ती मिळेल स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या या कार्याने भाराऊन जाऊन व प्रेरणा घेऊन बलसुर येथील समाज सेवक श्री. विष्णुदास तोष्णीवाल यांनी रु.२१०००/- देणगी रुग्णालयास देऊन स्पर्शच्या या सेवा कार्यास हातभार लावला. रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्य प्रसंगी विशेष प्रोटीन युक्त आहार पुरवठा करण्यासाठी आपला हातभार म्हणून हि देणगी रुग्णालयास आज प्रदान केली. आपण आजोबा झाल्याप्रीत्यर्थ, स्पर्शचा सेवाभाव बघून त्यांनी हि देणगी दिली. स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरचे श्री. रमाकांत जोशी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

………….

“माझ्या सुनेची सिझेरियन शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञांनी सांगितली होती. खाजगी रुग्णालयात ती करणे शक्य होते पण गेली २२ वर्ष स्पर्श ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा जवळून पाहतोय येथील स्वच्छता, कर्मचार्यांची रुग्णांना दिली जाणारी आपुलकीची वागणूक व नम्रपणा. डॉक्टरांकडून रुग्णाची काळजी पूर्वक केली जाणारी तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया या बद्दल माहित होते म्हणून माझ्या सुनेची सिझेरियन शस्त्रक्रिया मी स्पर्श ग्रामीण रुग्णालयामध्येच करण्याचा निर्णय घेतला. बाळ, बाळंतीण दोघे हि सुखरूप आहेत स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या या निस्वार्थ व आपुलकीच्या दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल त्यांच्या या आरोग्य सेवेत मी माझा खारीचा वाटा म्हणून रु.२१०००/- देणगी देत आहे.”
विष्णुदास तोष्णीवाल, बलसुर,
ता.उमरगा ,जि.उस्मानाबाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!