ग्लोबल कृषिकूल सेंटर येथे ग्लोबल विकास ट्रस्टचे कर्मचाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
बीड : सिरसाळा (ता.परळी वैजनाथ जि.बीड ) येथे हे प्रशिक्षण ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत शेतकऱ्यासाठी ग्लोबल कृषीकुल ट्रेनिंग सेंटर उभा करण्यात येत आहे. या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टच्या कर्मचाऱ्याचे दिनांक 03 जाने ते 05 जाने 2023 रोजी प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणासाठी एकूण 09 जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.या प्रशिक्षणामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ग्लोबल विकास ट्रस्ट व त्याचे करण्यात येणाऱ्या कामाबद्दल सविस्तर ची माहिती सांगण्यात आली.
यामध्ये ग्लोबल विकास ट्रस्ट चे प्रमुख श्री मयंक गांधी यांचे जीवन कार्य तसेच काम करत असताना विविध शासकीय कार्यालय सामाजिक संस्था यांच्याशी संलग्न राहून कसे काम करावे याबद्दल माहिती सांगण्यात आली तसेच 2022 चा कामाचा आढावा व 2023 मध्ये आपल्या ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत करण्यात येणाऱ्या फळबाग लागवड कार्यक्रमाचे नियोजन कशाप्रकारे करायचे याबद्दल सविस्तर अशी माहिती सर्व वरिष्ठ कडून करण्यात आली.
तसेच ग्लोबल विकास ट्रस्ट अंतर्गत विविध ठिकाणी केलेल्या जलसंधारणाचे व फळबाग रोप लागवड कामाची सुद्धा पाहणी करण्यात आली. या प्रशिक्षणला ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री विजय गव्हाणे असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर श्री कृष्णा राठोड का ग्लोबल विकास ट्रस्ट ट्रेनिंग प्रोग्राम हेड श्री शिवलिंग रूद्राक्ष सर विकास शेंडगे सर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.