लोकमतचे बालाजी बिराजदार यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडा स्तरीय पत्रकारिता व्दितीय पुरस्कार जाहीर
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कार २०२१-२०२२ चे पुरस्कार ५ जानेवारी रोजी जाहीर केले असून ज्येष्ठ पत्रकार एम. बी. पटवारी यांना वृत्तपत्र क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे स्मृती जीवन गौरव पुरस्कार घोषीत झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ हजार रु. व सन्मानपत्र,सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत तेरा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात
उत्कृष्ठ वार्ता गट
प्रथम पुरस्कार
दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे फुलंब्री
जिल्हा औरंगाबाद येथील प्रतिनिधी गणेश जाधव यांच्या ‘ शेतात राबणाऱ्या हातामध्ये नेमबाजीचे पिस्तूल ‘ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय पुरस्कार दैनिक सकाळचे उदगीर जिल्हा लातूर येथील प्रतिनिधी युवराज धोतरे यांना ‘ चोंडीकरांनी रात्र काढली जागून तलावाच्या पाळूमधून गळती लागल्याने’ या बातमीस ‘ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह ,
तृतीय पुरस्कार
दैनिक लोकमतचे हंडरगुळी ता.उदगीर जि.लातूर येथील प्रतिनिधी डी. ए. कांबळे यांच्या ‘ ग्रामपंचायत तलाठी सज्जा समोर मांडली वेळ अमावस्येची पूजा ‘ या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शोध वार्ता गट
प्रथम पुरस्कार
दैनिक लोकमतचे लातूर येथील प्रतिनिधी संदीप शिंदे यांच्या ‘ अपुर्या केंद्रामुळे आधार कार्ड मिळेना, पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित..! ‘ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,
व्दितीय पुरस्कार
दैनिक लोकमतचे लोहारा जि. उस्मानाबाद येथील प्रतिनीधी बालाजी बिराजदार यांच्या ‘ आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची!’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह .
तृतिय पुरस्कार
औराद शहाजानी येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी बालाजी थेटे यांच्या ‘ औराद परिसरात कर्नाटकी लालपरी सुसाट’ या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील , राजर्षी शाहू महाविद्यालयाचे जनसंवाद विभागाचे प्रा,शिवशंकर पटवारी लातूर यांनी काम पाहिले तर जेष्ठ पत्रकार अॅड एल. पी.उगीले, व्ही.एस. कुलकर्णी, प्रा.प्रविण जाहूरे, डाॅ.धनाजी कुमठेकर या निवड समितीने जीवन गौरव पुरस्काराची निवड केली आहे.
मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.