ई फायलिंगमुळे न्यायालयाचे कामकाज पक्षकारांना कळणार – प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे

लोहारा : ई फायलिंगमुळे केस मध्ये न्यायालयाचे काय कामकाज आज झाले आहे. ते पक्षकार यांना कळणार आहे. त्यामुळे कामकाजात अधिक प्रमाणात पारदर्शकता निर्माण होऊन, लोकांचा विश्वास अधिक प्रमाणात वाढणार आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी केले आहे.
लोहारा शहरातील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर येथे लोहारा तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ई फायलिंग, ई ग्रंथालय, ई -मुद्देमाल, ई -पेमेंट तसेच ई न्यायालयाचे उदघाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश गुप्ता, लोहारा दिवाणी न्यायाधीश एम.एम. निकम,लोहारा दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन.एस. सराफ,कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश एस.एस.कळसकर, लोहारा विधीज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड.एम.यु.जट्टे,लोहारा,तुळजापुर येथील विधीज्ञ,न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे म्हणाल्या की,ई फायलिंग करूनच यापुढे प्रकरण न्यायालयात दाखल करावीत, यामुळे त्यांचा वेळ, पैसा, तर वाचेल याबरोबरच कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होऊन पर्यावरण संरक्षण जे सर्वाचे मुलभुत कर्तव्य आहे. व ही काळजी गरज आहे. ते पार पडणार आहे.तसेच फौजदारी कारवाई मध्ये तपासाअंती पोलीसांनी दोषारोप ई फायलीग प्रणालीचा वापर करून दाखल केल्याने तात्काळ केस दाखल होऊन पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होणार नाही. असे सांगितले व ई फायलीग बाबत मार्गदर्शन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!