सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचाची निवड

लोहारा : लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडीसाठी बुधवारी (दि.४) ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यासी अधिकारी भास्कर बेशकराव यांच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त सरपंच भाग्यश्री पाटील या होत्या. या सभेसाठी सदस्य हुसेन महेबूब शेख, परमेश्वर सुदाम भालेराव, संगीता दादासाहेब बाबर, वैजंता नितीन देशपांडे, शिलाबाई मारुती साळुंके, मनोज फुलचंद देशपांडे, राजश्री श्रावण चेंडके, किरण राजेंद्र पाटील, उज्वलाबाई नामदेव बडूरे उपस्थित होते. सकाळी दहा ते बारा या कालावधीत नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीची मुदत होती. यावेळी उपसरपंच पदासाठी हुसेन शेख यांचा नामनिर्देशन पत्र दाखल झाला. उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने उपसरपंचपदी हुसेन शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या सभेसाठी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक भोरे, तलाठी बेंबळीकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, आबासाहेब साळुंके, पोलीस पाटील बालाजी मातोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस प्रकाश भगत, माजी सैनिक राजेंद्र गुरव, ग्रामपंचायतचे शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक ऑपरेटर अमोल कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ माने, अजगर शेख, संतोष भालेराव, अण्णाराव देशपांडे, विक्रम भालेराव, नितीन देशपांडे, दादासाहेब बाबर, बालाजी मातोळे, जवाहीर भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!