अध्यापनाबरोबर प्राध्यापकांनी संशोधनावर भर द्यावा – आ. सतीश चव्हाण

उस्मानाबाद : दि. ०२ जानेवारी रोजी लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित ‘ समकालीन जागतिक घडामोडी : भारतापुढील संधी समस्या आणि आव्हाने ‘ ( Contemparary Global Events : Opportunity, problems and Challenges ) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या शुभेच्छापर संदेशामध्ये ‘जगामध्ये संशोधनाला खूप महत्त्व आहे, एखादे संशोधन हजारो चुली पेटवू शकते त्यामुळे प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबर संशोधनावर भर द्यावा असे मत आ. सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले’. याप्रसंगी परिषदेच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलचे विमोचन देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, प्रा. शेख साबिहा, प्रा. यू. एस. कोरे, प्रा. आर. वाय. पागोटे, प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर, प्रा. राजाराम निकम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.