जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षकांकडून २८ डिसेंबरच्या शासन अधिसूचनेचा निषेध

औसा – प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकानां उपशिक्षणाधिकारी व तत्सम वर्ग -2 पदाच्या पदोन्नति पासून वंचित ठेवणारे 28.12.2022 च्या शासन अधिसूचनेचा निषेध म्हणून येथील सर्व जिप माध्यमिक शिक्षकांनी काळी फित लावून निषेध नोंदवला. मागील 50 वर्षापासून जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग- 3 श्रेणी -2 अंतर्गत जिप माध्यमिक शिक्षकानां पदोन्नतिची एकमेव संधी उपलब्ध आहे. उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर या अधिसूचनेमुळे माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नति वर गदा येणार अाहे. मराठवाडा व विदर्भातील शोषित, वंचितांच्या हक्काची असलेल्या जिप प्रशाला जिवंत ठेवून गुणवत्ताधारक अनेक विद्यार्थी घडवत असताना ही अधिसूचना जिप माध्यमिक शिक्षकांवर अन्याय करणारे असून, शासनाने तात्काळ ही अधिसूचना मागे घेऊन, माध्यमिक शिक्षकानां उपरोक्त पदोन्नति चा समावेशाचे अधिसूचना काढावी अशी मागणी जिप माध्यमिक शिक्षकांकडून होत आहे.
या संदर्भात शिक्षक आमदारांनी जातीने लक्ष देऊन 28.12.2022ची अधिसूचना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करावे अन्यथा राज्यभरातील सर्व जिप माध्यमिक शिक्षक शिक्षक मतदार संघ निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आव्हान केले आहे. अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शिक्षण मंत्री, मा शिक्षण सचिव, मा शिक्षण आयुक्त व मा. संचालक शिक्षण यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचे माहिती जिप माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कृती समिती,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिनिधी नी दिला आहे.