क्राईम

“अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 09 छापे ”

धाराशिव : मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल शुक्रवार दि.31.01.2025 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 09 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 10,600 लि. द्रव नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 604 लिटर गावठी दारु,247 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 13 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रव व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 5,09,430 ₹ आहे. यावरुन 09 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 09 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यावेळी पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील-नवजोत पुराजी राठोड, वय 37 वर्षे,यांनी 07.40 वा.सु. नवजोत पुराजी राठोड यांचे शेतात पळसगाव तांडा येथे 2,800 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 135 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली. यावेळी पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील-प्रदिप श्रीमंत राठोड,यांनी 08.05 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे पुर्व काठालगत पळसगाव ता. उमरगा येथे 2,400 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 165 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली. यावेळी पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील-प्रकाश सोमला पवार, यांनी 08.30 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे पुर्व काठालगत पळसगाव ता. उमरगा येथे 2,600 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली. यावेळी पळसगाव तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील-जयचंद लक्ष्मण राठोड, यांनी 09.20 वा. सु. पळसगाव ता. उमरगा येथे 2,800 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 150 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली.


2) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यावेळी दारफळ ता. जि. धाराशिव येथील- जयराम गजेंद्र क्षिरसागर, वय 48 वर्षे, हे 16.30 वा. सु. औसा ते धाराशिव जाणारे रोडलगत असलेल्या दारफळ पाटी जवळील हॉटेल निखीलच्या पाठीमागे देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या. यावेळी पाटोदा ता. जि. धाराशिव येथील- अमोल राजेंद्र माळी, वय 30 वर्षे, हे 19.00 वा. सु. करजखेडा ते पाटोदा जाणारे रोडवर सा.बा.विभाग कॉलनीचे समोर रोडच्या बाजूस पत्राचे शेड लगत मोकळ्या जागेत 32 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली. यावेळी आरणी ता. लोहारा जि. धाराशिव येथील-नागेश दत्तात्रय कदम हे 18.00 वा. सु. भंडारी शिवारात राष्ट्रीय महामार्गाचे बाजूला हॉटेल समोर मोकळ्या जागेत 32 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना आढळली.

3)धाराशिव शहर पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग, धाराशिव ता. जि. धाराशिव येथील-कुणाल अनिल पवार, वय 30 वर्षे, हे 19.15 वा. सु. भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव येथे 29 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. यावेळी जुना बस डेपो पारधी पिडी, धाराशिव ता. जि. धाराशिव येथील-संगीता रतन काळे, वय 48 वर्षे, हे 20.25 वा. सु.आण्णाभाउ साठे चौक धाराशिव येथे 218 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!