देवगिरी ग्लोबल अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरासाठी निवड

उस्मानाबाद : लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी स्कूलचे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ऐरोसिकाई, के १, लोबाफाईट या सिकाई मार्शल आर्ट शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरीय 12 डिसेंबर रोजी पार पडल्या. त्यामध्ये स्कूलमधील एकूण 6 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये या 6 विद्यार्थ्यांची विभागामध्ये निवड झाली. आणि विभागीय स्पर्धा या 13 ते 14 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. यामध्ये मुलांमधून राधेश ढेकणे, पृथ्वीराज आसुरे, अथर्व ओवांडकर तर मुलींमधून प्रतीक्षा फुलसुंदर, अनुष्का सगर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्य सौ.मधुमती गोरे यांनी अभिनंदन केले तसेच यासाठी कराटे शिक्षक शेख यांनी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करून त्यांचा सराव करुन घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!