काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पाटील यांनी केला विलासपूर पांढरीच्या नूतन सरपंच, सदस्याचा सत्कार

उस्मानाबाद : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथील नूतन सरपंच मारुती कार्ले, नूतन सदस्य बसवेश्वर कार्ले, सुभाष पाटील, विठ्ठल जांभळे ,दगडू भिसे यांनी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी पाटील यांनी नूतन सरपंच व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सदाशिव कार्ले, शिवाजी कार्ले,निलाप्पा भुजबळ , संभाजी देठे आदी उपस्थित होते.