खाजगी एजंटाकडून निराधारांची लूट ; छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

उस्मानाबाद : निराधारांच्या विविध मागण्या संदर्भात श्री शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे कालिदास (महाराज) गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला.सविस्तर वृत्त असे आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा योजना राज्य निवृत्ती वेतन योजनांचा गरजूंना लाभ मिळत नसून संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि खाजगी एंजटांमुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अनेक अडथळ्यांच्या सामना करावा लागत आहे.या योजनांच्या नावाखाली निराधारांची लुट खाजगी एंजटांमार्फत होत आहे.अधिकार्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.यामुळे वारंवार अर्ज दाखल करून सुद्धा अनेक निराधार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आता न्याय मागायचा कोणाकडे हा मोठा प्रश्नच आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांसाठी अर्ज केलेल्या लोकांना सतत तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास १५ दिवसात निर्णय नाही घेतल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष कालिदास (महाराज) गायकवाड,उमरगा तालुका अध्यक्ष बाळासाहेब माने, शहराध्यक्ष ज्योतिराम काळे, सचिन जाधव,नरसिंग बायस, नाना ढाले यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!