पेवे नं. १ येथील जिल्हा परीषद शाळेत माता पालक सभा संपन्न

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पेवे नं.१ येथील जिल्हा परीषद शाळेत निपुण भारत मिशन अंतर्गत ६ ते ९ वयोगटातील (१ ली ते ३ री) विद्यार्थ्यांच्या माता पालक सभेचे आयोजित करण्यात आले होते .
याप्रसंगी श्री निलेश देवकर यांनी निपुण भारत मिशन म्हणजे काय त्याचे ध्येय,उद्दिष्टे याविषयी सविस्तर माहिती सांगितले.माता गट स्थापन करुन,या गटाचे नाव झाशीची राणी माता गट असे ठरवण्यात आले.या गटासाठी लीडर माता म्हणून सौ.श्रृती महेश पवार यांची निवड करण्यात आली.या निमित्त सौ.पूजा गणेश शिगवण यांनी लीडर मातेचे पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर श्री निलेश देवकर यांनी लीडर मातेचे कर्तव्य समजावून सांगितले. तसेच सर्व माता गटातील सदस्यांसोबत विद्यार्थी प्रगती आणि येणाऱ्या अडचणी यावर चर्चा विद्यार्थी समावेत करण्यात आली.
यासभेसाठी सौ.पूजा गणेश शिगवण, सौ.ईशा संजय दुर्गवले,सौ.श्रृती महेश पवार,सौ.निधी ज्ञानेश्वर दुर्गवले, सौ. ऐश्वर्या जनार्दन शिगवण,श्री निलेश देवकर,सहदेव गोरे उपस्थित होते.