शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांच्या काजवा या आत्मकथनाच्या तिसऱ्या आवृतीचे प्रकाशन

औसा / रमेश शिंदे
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये वर्ग-२ चे मुख्याध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक सेवेचा शुभारंभ केलेले पोपटराव श्रीराम काळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटविला आहे.नागरसोगा शाळेचे मुख्याध्यापक त्यानंतर नांदेड बीड अहमदनगर जिल्ह्यासह लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लातूर जिल्हा परिषदेत प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले असून सध्या पुणे येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काजवा या आत्मकथनाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २० आक्टोबर रोजी सकाळी १० – ३० वाजता लातूर येथे राज्याचे माजी मंञी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते माजी आ. वैजनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ.विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव या गावचे मुळ रहिवाशी असलेले पोपटराव काळे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आई वडीलांनी ऊस तोडणी करुन पोपटराव काळे यांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांची शिक्षण क्षेत्रात वर्ग २ या पदावर निवड झाली. शिक्षण क्षेत्रात झपाटल्यागत काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली. नागरसोगा येथे मुख्याध्यापक वर्ग २ या पदावर काम केल्यानंतर अनेक तालुका कार्यालयात त्यांनी गट शिक्षणाधिकारी म्हणून काम केले.ते सध्या पुणे येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पोपटराव काळे यांनी काजवा हे आपले आत्मकथन लिहले आणि त्याच्या दोन आवृत्त्या हातोहात संपल्या. २० आक्टोबर रोजी ग्लोबल नाँलेज पब्लिक स्कुल बार्शी रोड लातूर येथे काजवा या आत्मकथनाच्या तिसऱ्या आवृत्ती चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभास लातूर विभागिय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग लातूरचे विभागिय शिक्षण उपसंचालक डाँ. गणपतराव मोरे लातूर जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे माध्यमिक शिक्षणाधिकारी नगेश मापारी मनोविकास प्रकाशन पुणे चे संचालक अरविंद पाटकर या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बिरादार विवेक सौताडेकर प्रकाश देशमुख संभाजी नवघरे यांनी केले आहे.

शिक्षणाधिकारी पोपटराव काळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!