मारहाणीत जखमी झालेल्या होळी येथील युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू

लोहारा : लोहारा तालुक्यातील होळी येथे झालेल्या मारहाणीतील जखमी युवकाचा सोमवारी (ता. २६) उपचारादरम्यान सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. यावेळी गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. सायंकाळी पोलिस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रणजित मोहन जाधव (वय २५) असे मयताचे नाव आहे. तालुक्यातील होळी येथील योगेश कदम, मोहन कदम व रणजित जाधव यांच्यात कौटुंबिक वाद होता. शुक्रवारी (ता. २३) होळी-नारंगवाडी शिवारात यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. योगेश, मोहन या दोघांनी रणजित यास बेदम मारहाण केली. गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत रणजित च्या वडिलांनी योगेश, मोहन यांच्याविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या रणजितला सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. अखेर रणजितचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कळल्याने रणजितच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावात काही काळ तणावाचे वातावरण होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सायंकाळी मयत रणजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले.