तुळजापुरात ७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

तुळजापूर : तुळजापुर येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूरच्या वतीने श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त शनिवार, दिनांक : ०७ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १० : ०० ते सायंकाळी ०६ : ०० वाजेपर्यंत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत एकूण दोन गटात राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभनीची

वक्ता महाराष्ट्राचा २०२३ (वर्ष १४ वे) तुळजाभवानी कला वाणिज्य महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेचे माहिती पत्रकाचे प्रकाशन आमदार राणाजगजितसिंह पाटील, योगिता कोल्हे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, माजी नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोजकरी, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष अमर (दाजी) हंगरगेकर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे,धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम,

जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद (दादा) कंदले, स्पर्धाप्रमुख निरंजन डाके निमंत्रक तानाजी म्हेत्रे, राजाभाऊ चोपदार, आण्णासाहेब क्षीरसागर यांच्या शुभहस्ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, नवीन प्रशासन कार्यालय, तुळजापूर येथे करण्यात आले . यामध्ये आगामी शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२३ मध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वतीने सांस्कृतिक महोत्सव घेणेबाबत आश्वासन देण्यात आले.


या स्पर्धेत गट १ इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीसाठी १) भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा २) माणसात देव शोधणारा संत- संत गाडगेबाबा ३) मला भावलेले आदर्श व्यक्तिमत्व ४) नारी सन्मान देशाचा अभिमान ५) मला खेळायचे आहे: मोबाईल नको हे पाच विषय असून यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त ०१ स्पर्धकाला प्रवेश देण्यात येणार आहे व वेळ ०५ मिनिटे, गट २ इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीसाठी १) छत्रपती शिवराय: मॅनेजमेंट गुरु २) भारतीय तरुण: इतिहास व भविष्य ३) कधी थांबणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या? ४) कोरोनामुळे काय कमावले व काय शिकले ५) वैभवशाली मराठवाडा हे पाच विषय असून यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त ०१ स्पर्धकाला प्रवेश देण्यात येणार आहे व वेळ ०७ मिनिटे स्पर्धेमध्ये पारितोषिके म्हणून गट १ व २ साठी स्वतंत्र पारितोषिके प्रथम रोख रुपये ५०००/- चषक व प्रमाणपत्र, द्वितीय रोख रुपये ३,०००/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय रोख रुपये २,०००/- चषक व प्रमाणपत्र, चतुर्थ रोख रुपये १,५००/- चषक व प्रमाणपत्र पाचवे रोख रुपये १,०००/-चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ ०५ प्रत्येकी रोख रुपये ५००/- चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तुळजापूर तालुक्यासाठी दोन्ही गटासाठी स्वतंत्र पारितोषिके प्रथम क्रमांक रोख रुपये १,५००/- चषक व प्रमाणपत्र द्वितीय १,०००/- चषक व प्रमाणपत्र तृतीय रोख रुपये ५,००/- चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी रोख रुपये २५०/- चषक व प्रमाणपत्र


तसेच गट पहिला गट दुसरा या गटातून सर्वाधिक गुणक्रमांकानुसार पारितोषिके प्राप्त शाळेस उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कै. डी.आर. बनसोडे यांच्या स्मरणार्थ श्रीतुळजाभवानी फिरता चषक, व डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल व सर्व गटातून उत्कृष्ट वक्ता दिवसाचा मानकरी “स्पर्धा तुळजाभवानीची. . . वक्ता महाराष्ट्राचा” हे पारितोषिक देण्यात येईल. ह्या स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व शाळेसाठी खुल्या व विनामूल्य राहतील. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम दिनांक : ०३ जानेवारी, २०२३ आहे. अधिक माहितीसाठी निरंजन डाके मोबाईल नंबर ७८४३०८१८०९ या नंबर संपर्क साधावा या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सचिव देवेंद्र पवार, प्रा. प्रशांत भागवत, उपाध्यक्ष जीवन इंगळे, विनोद पलंगे, कार्याध्यक्ष संदीप गंगणे स्पर्धा प्रमुख शिवशंकर जळकोटे, संदीप गंगणे, निरंजन डाके, अविनाश सराटे ,श्रीमती. उज्वला जोशी ,श्रीमती. जयश्री माळी ,श्रीमती. जयमला वटणे निमंत्रक मिलिंद रोकडे, चंद्रकांत साळुंके, राहूल कुलकर्णी, अमर वाघमारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!