उमरगा शहरात राज्यस्तरीय शिवनेरी क्रिकेट चषक थरार सुरु

उमरगा प्रतिनिधी : तब्बल दोन वर्षांनंतर क्रिकेट रसिकांना शिवनेरी चषक अंतर्गत क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी मिळत असल्याने सध्या हळूहळू शहरात क्रिकेटचा माहोल तयार होऊ लागला आहे. शिवनेरी चषक शिवनेरी प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि.१९) रोजी माजी सचिव, जलसंपदा विभाग व्यंकटरावजी गायकवाड यांच्या हस्ते व माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, जितेंद्र (दादा)शिंदे, व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

तसेच यावेळी मागील दोन वर्षात विविध खेळात प्राविण्य मिळवलेले कु.आर्या सुरेंद्र वाले (धनुर्विद्या), कु.सोनाली संतोष पवार (भालाफेक), कु.मेहराज हबीब अत्तार(कबड्डी), कु.हर्षदा बळीराम चाकुरे (ज्युदो कराटे), साई प्रताप सिंह राठोड(आईस हॉकी), चि.गणेश चंद्रमोहन गालीपल्ली(आईस हॉकी), चि.मोहन राठोड (आईस हॉकी), चि.यशराज बळीराम चाकुरे (धावपटू), चिसमर्थ सुनील पाटील (बुद्धिबळ), चि.निळकंठ श्रीधरराव माने (राष्ट्रीय नेमबाज), चि.अर्जुन तानाजी बिराजदार(बॅडमिंटन), चि.आर्यन तानाजी बिराजदार (बॅडमिंटन)अशा खेळाडूंना क्रिडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


यावेळी युवानेते किरण गायकवाड, भाजपा नेते संताजी चालुक्य, युवानेते हर्षवर्धन चालुक्य, डॉ.मल्लिनाथ मलंग, कंत्राटदार सुनील माने, उपजिल्हाप्रमख बसवराज वरनाळे, कैलास शिंदे तालुकाध्यक्ष भाजपा, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकापरमुख जगन पाटील, सागर शिंदे, माऊली प्रतिष्ठानचे उमाकांत माने, लोहारा माजी नगसेवक अभिमान खराडे, ॲड.प्रवीण तोतला, माजी नगरसेवक सिद्रामाप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, माजी नगरसेवक संजय पवार, व्यापारी महासंघ अध्यक्ष रणधीर पवार, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर पाटील, शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, अजित गोबारे, विलास भगत, डॉ.प्रशांत मोरे, पोलीस निरीक्षक राठोड, माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, वहाब अत्तार, बालाजी पाटील, क्रिडा शिक्षक संजय कोथळीकर, राष्ट्रीय खेळाडू रणजीत ठाकूर, क्रीडा शिक्षक अंकुश औरादे, क्रीडा शिक्षक सु रेंद्र वाले, अरुण जगताप, ज्ञानेश्वर माऊली, बापूराव गायकवाड, रत्नाकांत सगर, सचिन जाधव, योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर सांगवे, मुजीब इनामदार, साठे, शफी चौधरी, प्रदीप मोरे, काका गायकवाड, खाजा मुजावर, समाधान मोरे, बाळू शिंदे, संदीप चौगुले, अमर शिंदे, भगत माळी, साई विभुते, हैदर शेख, अमित माने, ओम जगताप, विक्रम शहापुरे, मुर्तुजा मुंगले, लिंगराज स्वामी, शरद इंगळे, तुकाराम जाधव, खय्युम चाकुरे, विलास पतगे, नाना मदनसुरे, प्रताप लोभे, व्यंकट पाटील, बी.के.पवार, मनोज जाधव, जाहेद मुल्ला, विजय कदम, अमित सांगवे, अरुण महाकाली, विजय भोसले, महादेव शिरसागर, गजानन जाधव, रहीम शेख, इब्राहीम शेख, ताहेर शेख, बाळू मदनसुरे, निखिल वाघ, रोहित पवार, उद्धव बिराजदार, योगेश शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, फिरोज जमादार आदी व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. माधव जाधव व युवराज गायकवाड यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन केले.

 

क्रिकेटसाठी युवा नेते किरण गायकवाड यापूर्वीही दिले प्रोत्साहन

खेळ आणि मैदान याचे विशेष आकर्षण युवा नेते किरण गायकवाड यांना आधीपासून असल्याने तरुणाईला देखील याची आवड असावी यासाठी अनेकदा ते खेळाच्या स्पर्धांना प्रोत्साहन देत असतात.२००६ पासून किरण गायकवाड यांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळेच उमरगा शहरता क्रिकेट स्पर्धा रंगल्या होत्या,त्यानंतर गेली दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही गायकवाड स्पर्धेस प्रोत्साहन देऊ शकले नव्हते.

🔶 दोन गटात स्पर्धा

शिवनेरी चषक हे दोन गटात विभागणी करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय खुला गट तुन ३२ संघ सहभाग नोंदविला आहे. यासाठी प्रथम पारितोषक २ लाख ५१ हजार रु. तर द्वितीय पारितोषक १ लाख ५१ हजार रु. उमरगा- लोहारा तालुका गटातून६४ संघ सहभाग घेतला आहे. यामध्ये गट प्रथम पारितोषक १ लाख ११ हजार रु . तर द्वितीय पारितोषक ७१ हजार रु. यासोबत विविध प्रकारात हजारोची बक्षिसाचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!