लोहारा तालुक्यातील १२ गावचे कारभारी आज ठरणार

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतच्या मतमोजणीसलोहारा तहसिल कार्यालयात आज मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता होणार सुरवात होणार असून ८ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी ६८ कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे. ८ फेऱ्यात ही मतमोजणी होणार आहे. कोणत्या ग्रामपंचायतवर कोणाचे झेंडा फडकणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोहारा तालुक्यातील मुदत संपलेल्या १३  ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक  निवडणूक होत आहेत. यामध्ये वडगाव (गां) ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निघाली आहे. उर्वरीत माकणी, सास्तूर, जेवळी, अचलेर, सालेगाव, तोरंबा, वडगाव, उंडरगाव, नागूर, विलासपूर (पांढरी), हिप्परगा (रवा), माळेगाव या १२ ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या १२ जागांसाठी ३५ तर सदस्यपदाच्या १२० जागांसाठी २६१ उमेदवार निवडणूक रींगणात उतरले आहेत. थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होत असल्याने प्रत्येक गावांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. निवडणुकीत एक-एक मत महत्वाचे असल्याने कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांना घेऊन येण्यासाठी उमेदवारांनी स्वतंत्र वाहानांची व त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे आज मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरवात होणार आहे. दुपारपर्यत सर्वच निकाल जाहीर होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!