जेवळी येथील सरपंच व सदस्यपदाच्या अधिकृत उमेदवारांना वाढता पाठिंबा

जेवळी (ता. लोहारा) : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री तिरुपती बालाजी मंदिर जेवळी महाविकास आघाडी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन गटाचे सरपंच व सदस्य पदाच्या अधिकृत उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

 

जेवळी ग्रामपंचायत निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात विविध मार्गाने प्रचार शिगेला पोहोचला आहे यावेळी या निवडणुकीत विका सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री मल्लिनाथ निंगप्पा वेलदोडे, श्री बसवराज सिद्रामप्पा कारभारी, श्री प्रभुराज मल्लिकार्जुन पणुरे, श्री रमेश शंकरराव पाटील, श्री नागप्‍पा मारुती जेवळीकर, श्री श्रीमंत शंकराव घोडके, श्री बालाजी हरिभाऊ माळी, श्री उमला पुना जाधव आदींच्या नेतृत्वाखालील श्री तिरुपती बालाजी मंदिर जेवळी महाविकास आघाडी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन गटाचे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार विका सेवा सोसायटीचे माजी चेअरमन यांच्या पत्नी सौ सुवर्णा मल्लिनाथ वलदोडे व प्रभाग चार मधील सदस्यासाठीचे उमेदवार श्री विनायक गुंडप्पा चौगुले, वार्ड क्रमांक पाच मधील उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्य श्री मल्लिनाथ लिंगप्पा वलदोडे, वार्ड क्रमांक सहा मधील उमेदवार श्री पोमा देविचंद जाधव या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत आहे.

🔴 या पॅनलचे अभिवचन

१. ग्रामपंचायत मध्ये आलेले निधी १ ते ६ वार्डात समान न्यायाने व सर्व १ ते ६ वार्डात टप्या टप्याने सिमेंट रस्ते करण्यात येतील तसेच पावसाळ्यात खडक टाकताना तोंड बघुन न टाकता प्रथम प्राधान्य गोरगरिबांच्या घरासमोर टाकण्यात येईल. व नंतर मोठ्या लोकांच्या घरासमोर टाकण्यात येईल.

२. दररोज नळाला पाणी सकाळी व संध्याकाळी सोडण्यात येईल.

३. दररोज रोड लाईट रात्री चालु ठेवण्यात येतील. दिवसा नाही.

४. प्रत्येक वार्डातील सर्व पोलावरती बल्ब लावण्यात येईल.

५. गावातील सर्व समाजातील धार्मीक / सतसंग कार्यक्रम व संत महापुरुषांची जयंती, मोहरम, बकरी ईद साजरी करताना ग्रामपंचायतीमार्फत अन्नपुर्णा योजना राबवुन महाप्रसाद व भोजनासाठी नियोजन करून निधी देण्यात येईल. जर ग्रामपंचायतमध्ये निधी नसेल तर गावचा सरपंच या नात्यांने मी वैयक्तीक निधी देईन.

६. गावातील प्रत्येक समाजातील संत महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नियोजन करुन निधी देण्यात येईल. तसेच वार्ड क्र. ४ मधील नागरिकासाठी गोंधळी समाजातील अंबाबाई मंदिराच्या शेजारी एक समाज मंदिर बांधून देण्यात येईल.

७. गावातील प्रत्येक गणेश मंडळ, नवरात्र देवी मंडळ, भजनी मंडळ, व्हॉलिबॉल टिम, क्रिकेट टिम या मंडळाला ग्रामपंचायतीमार्फत नियोजन करून निधी देण्यात येईल.

८. गावात प्रत्येक गोर गरिबांच्या लग्न कार्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शुभमंगल योजना राबविण्यात येईल. व नियोजन करुन निधी देण्यात येईल व तसेच वार्ड क्र. ३ मध्ये मसनजोगी समाजासाठी समाज मंदिर बांधण्यात येईल.

९. पुर्व तांडा येथील प्रत्येक घरातील विभक्त कुटुंबासाठी घरकुल योजनेमधुन प्रथम प्राधान्याने ग्रामपंचायती मार्फत पाठपुरावा करुन ५ वर्षात सगळ्यांना स्वतंत्र घरे बांधून देण्यात येईल. पुर्व तांडा येथे जीम / व्यायाम शाळा / वाचनायल तरुण युवकांसाठी क्रिकेट साहित्य देण्यात येईल. तसेच पुर्व तांडा येथील गावात शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत शाळेचे प्राचार्य, अध्यक्ष व सचिव यांना स्कुल बस चालू करण्यासाठी विनंती करण्यात येईल जर ती त्यांनी मान्य नाही केली तर ग्रामपंचायत मार्फत नियोजन करुन पुर्व तांड्यातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस चालू करण्यात येईल.

१०. गावातील घरपट्टी व नळपट्टी दोन्ही मिळून ५० टक्के माफ करण्यात येईल. धनगर, वडार, मसनजोगी, गोंधळी, तेली व इतर समाजातील गोरगरिबांना टप्याटप्याने वर्षाला घरकुल मंजूर करुन देण्यात येईल. तसेच सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर १ ते ६ वार्डात दिवाळी भेट योजना राबवून वैयक्तिक स्वखर्चातून सरपंच आपल्या दारोदारी येवून सर्वांना वर्षाला दिवळी भेट म्हणून फराळाचे किट वाटप करण्यात येईल.

११. मी ईश्वर शपथ घेवून सांगतो की ग्रामपंचायत मधील एकही रुपया माझ्या घर संसाराला लावणार नाही. व भ्रष्टाचार मुक्त कारभार चालविण्यात येईल. तसेच मी एकदा सरपंच झाल्यानंतर पुन्हा सरपंच पदासाठी निवडणूक लढविणार नाही हे वचन देवून नविन उमेदवाराला संधी देईन.

१२. जेवळी येथील ब्राम्हण गल्लीत गणेश मंदिरात प्रत्येक संकष्ट चतुर्थीला दर्शनासाठी येणाऱ्या सर्व महिला व पुरुष गणेश भक्तांना स्वखर्चातून पेढ्याचे मोदक किंवा पेढे प्रसाद म्हणून देण्यात येईल.

 संकल्प जनसेवेचा तुमच्या आमच्या विकासाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!