लोहारा शहरातील हजरत सय्यद नूर शाह जिंदा शाह मदार ऊरुसास प्रारंभ

उस्मानाबाद : लोहारा शहरातील सोनार पट्टी येथील हजरत सय्यद नूर शाह जिंदा शाह मदार ऊरुस सोमवार 12 डिसेंबर पासुन प्ररंभ झाला आहे.
लोहारा शहरातील सोनार पट्टी येथील हजरत सय्यद नूर शाह जिंदा शाह मदार ऊरुस सोमवार पासुन प्ररंभ झाला असून सोमवारी १२ डिसेंबर रोजी संदल व मिलादाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी १३ डिसेंबर रोजी चिरागाचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवारी १४ डिसेंबर रोजी जियारतचा कार्यक्रम होणार आहे. या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रम भाविक हजेरी लावतात. हजरत सय्यद नूर शाह जिंदा शाह मदार हा ऊरुस रत्नकांत ठाणेकर व सुमित ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोठ्याउत्साहात केला जातो.