दैनिक ‘सकाळ’ चे संपादक दयानंद माने यांना मातृशोक

उस्मानाबाद : दैनिक ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक दयानंद युवराज माने यांच्या मातोश्री निनाबाई युवराज माने (वय ७३) यांचे सोमवारी (ता. १२) निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उस्मानाबाद शहरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी 8 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दैनिक ‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक अभय दिवाणजी, जाहिरात व्यवस्थापक अभय सुपाते, प्रशासन अधिकारी अजय धाराशिवकर, मिलिंद इनामदार, काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्रमोद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शिंगाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!