महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या रामदेव बाबांवर कारवाई करा – कविता आल्हाट

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेध

पिंपरी : ( प्रतिनिधी )
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.२६) पिंपरी येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. या दोघांच्या विधानाबाबत संताप व्यक्त करत दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केली.पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, तसेच ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप, काशीनाथ जगताप, अकबर मुल्ला, निर्मला माने, मिरा कदम, दिपाली देशमुख, ज्योति गोफाने, ज्योति तापकीर,समिता गोरे, सुनीता आल्हाट, मनीषा पवार, सारिका पवार, ज्योती निंबाळकर, सारिका हरगुदे, माधुरी जट्टेवाडकर, शारदा सोडी, अर्चना जाधव, विजय दळवी, दीपक गुप्ता, संदिप चव्हाण, अनिल भोसले, अंनत सुपेकर, किरण नवले, , राजेंद्र हरगुडे ,रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी कविता आल्हाट म्हणाल्या,
नुकतेच ठाणे येथील कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी महिलांच्या पेहराव, कपडे, सुंदरता या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावे कर्नाटक राज्यात येण्याच्या तयारीत आहेत, असे विधान केले. या दोघांच्या विधानाविरोधात सर्व स्तरावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
—

रामदेव महाराज हे भाजपधार्जीण्या विचारांचे आहे. ते नेहमीच भाजपचा छुपा अजेंडा आपल्या कार्यक्रमातून, वक्तव्यातून राबवत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र यावेळी त्यांनी महिलांच्या बाबत वादग्रस्त विधान केले.रामदेव बाबा यांनी जाणून बुजून महिलांविषयी अश्लील, लज्जा उत्पन्न होणारे वक्तव्य केले आहे. याविषयीची क्लिप प्रसार माध्यम व इतर माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. रामदेव बाबा यांनी केलेले कृत्य हे जाणून बुजून केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
प्रा.कविता आल्हाट
शहर अध्यक्षा
राष्ट्रवादी महिला काँग्रेस

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!