अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा

उस्मानाबाद : मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 25.11.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उस्मानाबाद शहरातील तुळजापूर बायपास रस्त्यालगत असलेल्या मयुर पॅलेस हॉटेल & लॉजचे चालक- मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 16.25 वा. सु. छापा टाकला असता लॉजच्या खोल्यांमध्ये 5 महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक- मालक दोन पुरुष असून (नाव- गाव गोपनीय) ते त्या 5 महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या लॉज चालक- मालक दोन्ही पुरुषांस ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन व 1,000 ₹ रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या पाचही महिलांची सुटका करुन लॉज चालक- मालक दोन पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात आज दि. 26.11.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!