श्री संत मारुती महाराज विद्यालयातील विद्यार्थाचे तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत यश

लोहारा : लोहारा तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयातील विद्यार्थानी यश संपादन केले आहे.
रिले ४/१०० वयोगट १७ मध्ये ओंमकार सगर,प्रथमेश गिरी,कृष्णा लोंढे, गौरव कदम, हरीओम कुंभार यांचा संघ प्रथम आला आहे. वयोगट १७ मध्ये १०० मि‌टर धावणे मध्ये प्रथम ओंमकार सगर व लांबऊडी मध्ये द्धितीय ओमकार सगर, थाळी फेक वयोगट १७ मध्ये प्रथम गौरव कदम ,भालाफेक वयोगट १७ मध्ये प्रथम हरीओम कुंभार, व्दितीय कृष्णा लोभे व गोळा फेक मध्ये तिसरा तर बालिका १४ वर्षमध्ये लांबऊडी १४ वयोगटात व्दितीय हेमंत हिंडोळे, तिसरा संकेत नाझरेकर यासर्व विद्यार्थांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याना मार्गदर्शदन क्रिडाशिक्षक व्ही.एन. क्षिरसागर यांनी केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्याचे शाळेचे मुख्याध्यापक एस.एस. पवार , शिक्षक एम. टी.भोसले,ए.ए.शिंद, आर.आर. वळवी, के. एस.पवार, एस.जी. कांबळे,व्ही.डी. सुर्यवंशी,एस.डी.घाटे, एस. के. शेवाळकर यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

▶बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क :-     9422889961

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!